
|
मी चंद्रकात बच्चु पाटील कोल्हापूर जिल्हयातील गारगोटी तालुक्यातील खानापूर गावचा राहणारा असून मुंबई विद्यापीठात बी. कॉम चे शिक्षण घेत असताना माझा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आला, मुंबईच्या एका विभागाचा प्रमुख, पुस्तकपेढीचा प्रमुख, मुंबई शहराचा सहमंत्री हया विद्यार्थी दशेतील जबाबदार्या पूर्ण करीत असतांना संघटनेची पूर्ण वेळ काम करायला सुरवात केली. 1980 ते 1993 हया 13 वर्षाच्या पुर्णवेळ कालावधीत एक जिल्हा ते अखिल भारतीय सरचिटणीस पदा पर्यंतच्या सर्व जबाबदा-या यशस्वीपणे पेलल्या. काश्मिर, तीनबिधा, आसाम बचावसारखे संघर्ष याबरोबरीने 'सामाजिक समता' हा विषय घेऊन देशातील 55 शहरांचा या कालावधीत प्रवास झाला. 1993 ते 1995 पुर्ण वेळ काम थांबल्यानंतर व खानापूर हया 1400 लोकसंख्येच्या छोटया गांवात स्थिर होऊन शेती करायला सुरूवात केल्या नंतरही क्षेत्रीय (महाराष्ट्र,गुजरात, गोवा ) संघटन मंत्री होतो. 1995 ते 1999 रा. स्व. संघाचा कोल्हापूर विभाग सहकार्यवाह झालो. 2004 ते 2008 भा. ज. पा. चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस झालो. 2008 साला पूणे पदवीधर मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य झालो. |