|
नमस्कार
,
मी
तुम्हाला
आश्वाशन
दिले होते
की , मी
तुम्हाला
दर
आठवड्याला
अहवाल देईन.
आता यापुढे
न चुकता दर
आठवड्याला
अहवाल !
या आठवड्याचा
अहवाल
-
या आठवड्यात नवी दिल्ली येथे रामभाऊ म्हालगी प्रबोधिनिच्या वतीने " समग्र अटलदर्शन " या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा (Launching) कार्यक्रम पार पडला. आदरणीय अटलजींच्या संबंधित सर्व साहित्य संकलित (एकत्रित) करण्याचे काम यादिवशी सुरु झाले. या कार्यक्रमास माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुलकलाम, माजी उपपंतप्रधान श्री लालकृष्ण अडवाणी, लोकसभा विरोधी पक्ष नेत्या सौ. सुषमा स्वराज, राज्य सभेतील विरोधी पक्षनेते नामदार श्री. अरुण जेटली, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नितीनजी गडकरी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते खासदार श्री. शरद यादव उपस्थित होते. मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा सचिव या नात्याने व्यासपीठावर उपस्थित होतो. या प्रकल्पाकरिता आपणही सहकार्य करू शकता. मा.अटलजींचे काही दुर्मिळ साहित्या आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते माझ्या ई-मेल वर पाठवावे ज्यामुळे या अमूल्य साहित्यसंपदेची कुपी सर्वांकरिता खुली होऊ शकेल.
-
गेल्या आठवड्यात शिवशक्ती-भीमशक्तीची मोठी सभा कोल्हापुरात झाली. भारतीय रिपब्लिकन पार्टीचे नेते मा. रामदासजी आठवले, भाजपाचे जेष्ठ नेते माननीय आमदार गिरीषजी बापट व शिवसेनेचे जेष्ठ नेते माननीय आमदार दिवाकरजी रावते या मेळाव्यास उपस्थित होते.
-
कोल्हापुर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणार्या आणि ध्वनीप्रदूषणात वाढ करणार्या `डॉल्बी सिस्टीम' विरोधात सर्व गणेशोसव मंडळांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉल्बी न लावणे, गणेशस्थापनेचा मंडप ११ फुटाच्या वर नसणे, सामाजिक देखावा सादर करणे इ. विषयांचा विचार करून गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहनपर बक्षिसे जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाकरिता रुपये ५१०००/-, द्वितीय क्रमांकाकरिता रुपये ३१०००/-, तृतीय क्रमांकाकरिता रुपये २१०००/- ची अशी पारितोषिक मी घोषित केली.
हा झाला या आठवड्याचा अहवाल पुढील आठवड्यात पुन्हा भेटूयात दरम्यान आपणांस माझ्याशी काही संवाद साधायचा असल्यास
मला संपर्क करा.
|
समग्र अटलदर्शन कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...

गणेशोत्सवसंबंधातील बैठक, कोल्हापूर
|